भाजप खासदार नाना पटोलेंची अण्णा हजारे यांच्यासोबत 7 नोव्हें. रोजी बुलडाण्यात शेतकरी रॅली

BJP MP Nana Patole and Anna Hazare

मुंबई: आपल्याच पक्षाच्या सरकारवर आणि पक्षावर उघडपणे टीका करणारे भाजप खासदार नाना पटोले, भ्रष्टाचार विरोधातील अग्रेसर नेते अन्ना हजारे यांच्यासमवेत विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जाणा-या बुलढाणा जिल्ह्यात येत्या 7 नोव्हेंबर रोजी शेतकरी रॅली आयोजित केली आहे.

खासदार पटोले यांच्या भाजपशी असलेल्या राजकीय विरोधाभासामुळे पक्षाला आणि सरकारबाबत अनेकवेळा अडचणीत लागले. पटोले पुढील महिन्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना शेतक-यांच्या मुद्यावर भेटणार आहेत. ते राज्यातील तसेच केंद्रातील सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांनी शुक्रवारी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली आणि सध्या ते बंगळुरुला आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांची भेट घेत आहे.

भाजपच्या या बंडखोर नेत्याने पुणे येथे 15 नोव्हेंबर रोजी माजी केंद्रयी मंत्री यशवंत सिन्हा तसेच अरुण शौरी यांच्यासोबत व्यासपीठ शेअर केले. दोन्ही माजी मंत्री मोदी सरकारच्या धोरणांवर सातत्याने टीका करत आहेत.

भाजपच्या या लोकसभा सदस्याने शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्यासोबत यवतमाळ जिल्ह्यचा दौरा करण्याची घोषणाही केली आहे. यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्येसाठी बराच चर्चेत आहे. येथे किटकनाशकाच्या फवारणीमुळे झालेल्या शेतक-यांच्या मृत्यूमुळे हा जिल्हा आणखी झोतात आला आहे.