फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यापासून कोणीही अडवू शकत नाही : निरूपय

मुंबई : जोपर्यंत संविधानातील फेरीवाला संरक्षण कायदा लागू करण्यात येत नाही, तोपर्यंत मुंबईतील कोणताही फेरीवाला अनधिकृत नाही. त्याला स्वतःच्या जागेवर धंदा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांना व्यवसाय करण्यापासून कोणीही अडवू शकत नाही, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले.

जर या गरीब फेरीवाल्यांना पोलिसांचे संरक्षण मिळाले नाही, त्यांना जर मारहाण होत राहील. तर ते कायदा हातात घेतील. रस्त्यावर उतरतील, मग कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडेल आणि त्याची जबाबदारी फक्त तुमच्यावर असेल’, असे निरुपम बोलले मालाड पश्चिम येथे फेरीवाल्यांना दिलेल्या भेटीदरम्यान संजय निरुपम यांनी हे वक्तव्य केलं.

फेरीवाल्यांविरोधातील कारवाई ही पालिका प्रशासन,सरकार आणि मनसे यांची मिलीभगत आहे. माझे पोलिसांना सुद्धा सांगणे आहे की, या गरीब फेरीवाल्यांना जर कोणी मनसेचे फालतू गुंड त्रास देत असतील, दादागिरी करत असतील, तर त्यांना अडवा. त्यांच्यावर कठोर कारवाई करा.

‘फेरीवाला संरक्षण कायदा हा काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रयत्नाने केंद्रामध्ये काँग्रेसचे सरकार असताना पास करण्यात आला होता. पण महाराष्ट्र सरकार तो लागू करू इच्छित नाही. आम्ही तब्बल गेली साडेतीन वर्षे सतत महापालिका आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांकडे हा कायदा महाराष्ट्रात लागू करण्याची मागणी करत आहोत’.

Facebook Comments