‘हम सब बच्चे ही तो है ‘;नितेश राणेंचा संजय निरुपमला टोला

मुंबई : शहरातील फेरीवाल्यांना भडकावल्याप्रकरणी संजय निरुपम आणि मनसेमध्ये जोरदार वाद सुरु आहे. मात्र, आता या वादात उडी घेत निलेश राणे यांनी निरुपम यांच्या संदर्भात आक्षेपार्ह ट्विट केलं आहे.

नितेश राणे यांनी ‘हम सब बच्चे ही तो है’ अशा शब्दात ट्विट करत निरुपम यांची खिल्ली उडवली आहे. याचबरोबर ट्विटमध्ये संजय निरुपम यांना छोट्याशा खेळण्यावर बसलले दाखवले आहे.

संजय निरुपम यांनी हा वाद सुरू झाल्यानंतर नितेश राणे यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. ‘नितेश राणे कोणत्या पक्षात आहेत हे आतापर्यंत माहीत नाही, पहिल्यांदा हे शोधून काढले पाहिजे. ऐसे छोटे बच्चों के बारे में क्या बोलू?’,असे ट्विट केले होते. त्यावर नितेश राणे यांनी “हम सब बच्चेही तो है” अशा शब्दांत निरुपम यांची खिल्ली उडवली आहे.