निरोगी आरोग्य हवे ? मग झोपा या कुशीवर

sleep

चांगली तब्येत हवी असेल, तर तितकीच चांगली झोपही मिळणे आवश्यक आहे. चांगली आणि पुरेशी झोप न मिळाल्यास चिडचिडेपणा, डोकेदुखी, सुस्तपणा असे अनेक त्रास होऊ शकतात. म्हणून झोप ही निरोगी आरोग्यासाठी खूप महत्वाची आहे. पण केवळ पुरेशी झोपेवर तुमचे आरोग्य अवलंबून नसते तर तुमची अवस्थेचादेखील एक महत्त्वाची भूमिका बजावते. यात जर तुम्ही डाव्या कुशीवर झोपत असाल तर ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरते.

  • डाव्या कुशीवर झोपल्याने पचनक्रिया सुरळीत होते. तसेच पाचक प्रणालीवर अतिरिक्त दबाव येत नाही. यामुळे शरीरात जमा होत असलेले टॉक्सिन लसिका वाहिनी तंत्राद्वारे बाहेर पडतात.
  •  शरीरातील विविध आवयव तसेच मेंदूतील रक्तात ऑक्सिजनचा प्रवाह व्यवस्थित होतो. यामुळे आरोग्य निरोगी राहते.
  •  गरोदर महिलांच्या गर्भात वाढत असलेले बाळावर डाव्या कुशीवर झोपल्याने विपरित परिणाम होत नाही. तसेच त्यांच्याही अनेक समस्या कमी होतात.
  •   डाव्या कुशीवर झोपल्यास तुमच्या हृदयावर दबाव जाणवत नाही. यामुळे ते सुरळीत कार्य करते. परिणामी हृदय निरोगी राहण्यास मदत होते.
  •  बद्धकोष्ठता असलेल्यांनी या पद्धतीने झोपल्यास आराम मिळतो. गुरुत्वाकर्षणामुळे अन्न लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात सहज जाते. यामुळे सकाळी सहजपणे पोट साफ होते.