रुग्णवाहिके अभावी दागाविले नवजात बाळ

गडचिरोली: देशाच्या कानाकोपऱ्यात वीज पोहोचल्याचे सरकार भलेही छातीठोक पणे सांगत असली तरी देशाच्या दुर्गम भागात आरोग्यसेवा ही अजूनही पूर्वीसारखीच ढिसाळ आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात बाळ दगावल्याची घटना घडली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ताटीगुडम या अतिदुर्गम गावातील घटनेने राज्याच्या आरोग्य विभागाला मान खाली घालावी लागली आहे. अहेरी तालुक्यातील या गावातील बाळाला वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झल्याने आपला जीव गमवावा लागला.

गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील कमलापूर पासून जवळ असलेल्या ताटीगुडम येथे घरीच प्रसूत झालेल्या विनोदा पेंदाम या महिलेच्या नवजात बाळाला वेळेवर रूग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. विनोदा कृष्णा पेंदाम हिला शुक्रवारी प्रसुतीवेदना सुरू झाल्या. गावातील आशा वर्कर सरीता हिने कमलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश मानकर यांच्याकडे संपर्क साधून रूग्णवाहिकेची मागणी केली. मात्र वेळेवर
रुग्णवाहिका ताटीगुडम येथे पोहोचलीच नाही.

धक्कादायक म्हणजे कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक रुग्णवाहिका बंद आहे. त्यामुळे भाडे तत्त्वावह दुसरी रुग्णवाहिका घेण्यात आली आहे. ही दुसरी रुग्णवाहिका एका डॉक्टरने खाजगी कामासाठी नेल्याची माहिती पुढे आली
आहे. त्यामुळे वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध करुन देता आली नाही.

आणि या सर्व प्रकारात १० वर्षाने अपत्यसुख प्राप्त झालेल्या या दांपत्याला आपल्या चिमुकल्याचा जीव गमवावा लागला.