राष्ट्रवादीकडूनच निवडणूक लढविणार : निरंजन डावखरे

चिपळूण : मी शिवसेनेकडून निवडणूक लढविणार असल्याचे वृत्त खोडसाळ व गैरसमज निर्माण करणारे असून मी कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच लढविणार असल्याचे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले.
आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असल्याचे ते म्हणाले. रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अनिलकुमार जोशी यांनी रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शेखर निकम, कोकण पदवीधर मतदार संघाचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांच्याबरोबर त्यांनी चर्चा केली.

विरोधक दिशाभूल करणाऱ्या बातम्या देत आहेत. या अफवावर कोणत्याही प्रकारे विश्वास ठेवू नये, असे आमदार डावखरे यांनी सांगितले. यावेळी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनच उमेदवारी मागणार असून या पक्षातर्फेच निवडणूक लढविणार असल्याचे ते म्हणाले. ते एका वृत्तपत्राशी बोलत होते.