नक्षलवाद्यांना जनतेची साथ मिळणे कमी होऊ लागली- डीआयजी अंकुश शिंदे

गडचिरोली : अनेक वर्षांपासून निष्फाप आदिवासी लोकांना आपल्या दहशतीत ठेवून नक्षलवाद्यांनी त्यांना विकासपासून दूर नेले. नक्षलवाद आदिवासी लोकांना त्रासदायक वाटायला लागला असून नक्षल्यांचा फोलपणा गावक-यांच्या लक्षात येत आहे त्यामुळे नक्षवाद्यांना आता जनतेची शाथ मिळणे दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याचे गडचिरोली- गोंदिया परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांनी सांगितले.

ते एका वृत्त पत्राशी बोलत होते. रक्तरंजित क्रांती करून लोकशाही संपविणे हाच नक्षलवाद्यांचा उद्देश आहे. मात्र तो कदापीही यशस्वी होणार नाही, असे ठामपणे सांगून, ज्यांच्यामुळे हजारो आदिवासींवर विस्थापित होण्याची वेळ आली ते नक्षलवादी आदिवासींचे हित काय जोपासणार?

जानेवारी महिन्यात गडचिरोलीत घेतलेल्या रोजगार मेळाव्यात एकाच दिवशी ८०० पेक्षा जास्त बेरोजगारांना विविध कंपन्यांमध्ये नियुक्ती पत्र देण्यात आले. पोलीस विभागाप्रमाणे इतरही विभागांनी तालुकास्तरावर अशा पद्धतीचे मेळावे घेतल्यास बेरोजगारांच्या हाताला काम मिळणे सोपे जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

बेरोजगारीमुळे काही युवक नक्षल चळवळीकडे वळले जातात. त्यांना त्यापासून रोखण्यासाठी सरकारी नोक-यांमध्ये त्यांना संधी मिळावी म्हणून पोलीस मदत केंद्र, उपपोलीस ठाणे, एओपींमध्ये वाचनालय सुरू केले आहेत. स्पर्धा परीक्षांची पुस्तके बेरोजगारांसाठी उपलब्ध केली जातात. पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाचेही आयोजन केले जाते. त्याचा फायदा घेत अनेक आदिवासी युवक-युवती पोलीस व इतर नोक-यांमध्ये लागत आहेत.