बाळासाहेबांसारखे व्यक्तिमत्त्व देशात झालेले नाही ; नवाजुद्दीन सिद्दिकी

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सारखा दुसरा नेता देशात झाला नाही , अशी प्रतिक्रिया अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी याने दिली .

नवाजुद्दीनची भूमिका असलेल्या ‘मंटो’ चित्रपटाची कान्स चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली आहे. त्यानिमित्त एका मुलाखतीत बोलताना त्याने ‘मंटो’ची भूमिका साकारली तितक्याच प्रामाणिकपणे आपण बाळासाहेबांची भूमिका साकारू असा विश्वासही व्यक्त केला. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत निर्मित ‘ठाकरे’ हा चित्रपट पुढील वर्षाच्या प्रारंभाला प्रदर्शित होणार आहे.

‘ठाकरे’ चित्रपटातील भूमिकेबद्दल बोलताना नवाजुद्दीन याने सांगितले की, बाळासाहेब हे एक कलाकार होते, व्यंगचित्रकार होते. मराठी माणसाचे नेतृत्व करण्यासाठी सर्वस्व पणाला लावणारे बाळासाहेबांसारखे व्यक्तिमत्त्व देशात झालेले नाही असे नवाजुद्दीनने सांगितले.