नवविवाहित सुवासिनीसाठी ट्रेंडी ‘मंगळसूत्र’….

mangalsutra

२०१८ मधील सर्वात बिग बजेटच्या लिस्टमध्ये सोनमच्या लग्नाचे नाव घेतेले जात आहे. तिच्या मेहंदी पासून तर सेलेब्सने केलेली मस्ती या बद्दलची चर्चा सगळीकडे होत आहे. परंतु या व्यतिरिक्त सध्या चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे तिचा ‘मंगळसूत्र’. तिचे हे मंगळसूत्र फाईन डिझायनर उषिता रौतानीने बनवले असून याचे डिझाइन सोनमने स्वतःच केलं आहे. या मंगळसूत्राची विशेषता म्हणजे सोनमने तिचा नवरा आनंद व स्वत:च्या राशीचे चिन्ह बनवून घेतलं आहे. सोनमची रास मिथुन व नवऱ्याची रास सिंह असून या दोन्ही राशींचे चिन्ह मंगळसूत्रात दोन्ही बाजूस आहे. एवढचं नाही सोलिटेअरचा हिरा या मंगळसूत्राची शान वाढवत असल्याचं दिसतं आहे. सोनमची ही आयडिया आधीच्या काळाची आठवण करून देते.

आधी कसे साध्या सोन्याच्या चेन मध्ये नवऱ्याचा नाव किंवा फोटो असायचा. मात्र आता तसे होत नाही. हल्ली तर महिला आपल्या सौभाग्याचा दागिन्याला खूप कमी वापरतांना दिसतात. यामुळे कोण विहाहित आहे आणि कोण नाही हे ओळखायला अवघडच जाते. मात्र सोनमने आणलेला हा नवीन ट्रेंड महिलांना नक्कीच आवडेल. हा दिसायला सुंदर आणि तेवढेच नाजूक आहे. त्यामुळे हा मंगळसूत्र जिन्सवर देखील वापरता येतो. एवढेच नाही तर आॅफिस किंवा कुठलीही पार्टी असो, या मंगळसूत्रााने तुम्हाला मस्त ग्लॅमरस लुक मिळेल. तुम्ही देखील आपल्या नवऱ्याच्या राशी प्रमाणे चिन्ह देऊन सोनाराकडून हा मंगळसूत्र बनवून घ्या. यामुळे तुमचा लाडका नवरा नक्कीच खुश होणार. आपल्या नवऱ्याला खुश करण्याची हि संधी गमवू नका आणि लगेच बनवायला द्या हा साजेस दिसणार ट्रेंडी ‘मंगळसूत्र’.