स्कूल बसच्या चाकाखाली बालकाचा मृत्यू

नागपूर : स्कूलबसच्या चाकाखाली सापडून शिवम राघोते या तीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला. नागपुरातील उमरेडमध्ये ही घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली.

शिवम बसमधून खाली उतरत असताना बस चालकाने बस पुढे नेली. त्यामुळे चाकाखाली येऊन शिवम चिरडला गेला आणि त्याचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर संतप्त जमावाने स्कूल बसच्या काच फोडल्या. ड्रायव्हर परमेश्वर देशमुखला पोलिसांनी अटक केली आहे. वृंदावन कॉन्वेंट शाळेची ही बस होती. शाळेतून मुलांना घरी सोडण्यासाठी ही बस चालली होती त्याचवेळी हा प्रकार घडला.