टीव्ही अभिनेत्रीमुळे माझे मंत्रिपद हुकले : शत्रुघ्न सिन्हा यांची ‘मन की बात’

मुंबई: मोदी सरकारवरील प्रचंड नाराजीमुळे सरकारच्या ध्येय-धोरणांवर तुटून पडणारे भाजपचे खासदार अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा जळफळाट एक नव्हे तर दोन-तीन मंत्रिपदा मिळवणा-या पूर्वाश्रमीच्या टी व्ही अभिनेत्री स्मृती इराणीवर असल्याचे त्यांच्या ‘मन की बात’मधून अखेर समोर आले आहे. शत्रुघ्न सिन्हा म्हणतात “मला कॅबिनेट मंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले असताना एका टी. व्ही. अभिनेत्रीसाठी ते नाकारले गेले.” त्यांचा रोख केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे असल्याचे बोलले जात आहे.

राजकारणात उतरण्याचा निर्णय घेणारे दक्षिणेतील दोन सुपरस्टार रजनीकांत व कमल हसन यांना सल्ला देताना शत्रुघ्न सिन्हा यांची ‘मनकी बात’ समोर आली. ते म्हणतात, आपली’राजकारण ही काही सोपी गोष्ट नाही. रजनीकांत व कमल हसन यांनी निर्णय घेण्याआधी सर्व बाजूंनी विचार केला असेल अशी आशा आहे, आपल्या कलाकार मित्रांना सावधानतेचा इशारा देताना शत्रुघ्न सिन्हा यांनी स्वत:चा कटू अनुभवही सांगितला. ‘पक्षात माझ्यासोबत भेदभाव करण्यात आला. माझा अपमान करण्यात आला. पक्षाने मला कॅबिनेट मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, वेळ येताच ते पद एका टीव्ही अभिनेत्रीला देण्यात आले,’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

चित्रपट कलावंतांची लोकप्रियता पाहून राजकीय नेते स्वत:ला असुरक्षित समजू लागतात, हा मोठाच पेच असल्याचे ते म्हणाले. ‘चित्रपट वा टीव्ही कलाकारांना गर्दी जमवण्यासाठी राजकारणात आणले जाते. . कलाकारांना ग्लॅमरची आस असते. त्या आशेनेच ते राजकारणात येतात. मात्र, राजकारण हे आशावादाच्या पलीकडे आहे. त्यात मोठी ताकद असते. या ताकदीला प्रचंड ग्लॅमर असते,’ असे शत्रुघ्न म्हणाले. ‘रजनीकांत यांनी राजकारणात येताना माझा सल्ला घेतला असता तर त्यांना मी त्यांना उलटा सल्ला दिला असता,’ असोही शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले.