माझा भाऊ रोल मॉडेल : संजू चित्रपटावरील संघाच्या टीकेला प्रिया दत्तचे उत्तर

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र पांचजन्यमध्ये संजू सिनेमावरून संजय दत्तवर केलेल्या टीकेला उत्तर देत संजय दत्तची बहिण आणि मुंबईतील माजी खासदार प्रिया दत्तने संजय दत्तला रोल मॉडेल म्हटले आहे. पांचजन्यमध्ये संजू आणि राजकुमार हिरानी यांच्यावर प्रचंड टीका केली होती. त्याच म्हटले होते कि संजय दत्त आणि गुन्हेगारी जगाचे हिरानी यांनी उदात्तीकरण केले आहे. त्याला उत्तर देताना प्रिया दत्तने म्हटले आहे. ‘ प्रत्येकाचे काही विचार असतात. संघ नेहमीच सकारात्मकतेच्या विरोधात असतो. संजय दत्त एक रोल मॉडेल आहे. मला कळत नाही यात वाद कसला आहे?

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आघारीत संजू’ सिनेमावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘पांचजन्य’ या मुखपत्रात ‘टीका केली आहे. सिनेमाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे. सिनेमात हिरानी यांचे उद्दीष्ट संजय दत्तची प्रतिमा स्वच्छ दाखवण्याचा होता का? असा प्रश्न मुखपत्रात विचारण्यात आला आहे. या सिनेमातून गुन्हेगाराचे समर्थन करण्यात आले आहे. ज्या व्यक्तीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तीला स्टार कसे करू शकता?असा सवाल या लेखात उपस्थित करण्यात आला. एकीकडे संजय दत्तची प्रतिमा चांगली करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले जात आहे तर दुसरीकडे मात्र अनेकांना हा सिनेमा आवडतही आहे.