मुरली मनोहर जोशी यांची मोहन भागवतांशी बंदद्वार चर्चा?

नागपूर : काल रात्री उशिरा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची संघ मुख्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी विविध सामाजिक व सध्या सुरु असलेल्या राजकीय मुद्यांवर सरसंघचालकांशी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. महत्वाचं म्हणजे या वर्षात मनोहर जोशी यांनी दुसऱ्यांदा भागवतांची भेट घेतली आहे.

भाजपाविरोधात विरोधकांनी घेतलेली आक्रमक भूमिका, उत्तर प्रदेशमधील स्थिती आणि तोंडावर असलेल्या निवडणुका या पार्श्वभूमीवर भाजपचे जुनेजाणते नेते असलेल्या मुरली मनोहर जोशी यांची ही भेट अत्यंत महत्वपूर्ण मानल्या जात जात आहे. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत इतरही कुणी पदाधिकारी होते का याची माहिती कळू शकलेली नाही. यावेळी जोशी यांच्यासोबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलणे टाळले.