स्वच्छता सर्वेक्षणात मुंबई देशात सर्वोत्तम : २०१८’चे निकाल जाहीर

The Minister of State for Housing and Urban Affairs (I/C), Shri Hardeep Singh Puri addressing a press conference on Swachh Survekshan 2018, in New Delhi on May 16, 2018. The Secretary, Ministry of Housing and Urban Affairs, Shri Durga Shanker and other dignitaries are also seen.

मुंबई : कचरा संकलन, विल्हेवाट, खतनिर्मिती, जनजागृती आणि लोकसहभाग अशा स्वच्छतेच्या सर्व कसोट्यांमध्ये मुंबई महापालिकेला पहिले स्थान मिळाले असून स्वच्छता सर्वेक्षणात ती देशात सर्वोत्तम ठरली आहे. देशभरातील राजधान्यांमध्ये घेण्यात आलेल्या ‘स्वच्छता सर्वेक्षण २०१८’चे निकाल आज जाहीर करण्यात आले.

केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या निकषांनुसार पालिका क्षेत्रात स्वच्छता अभियनाच्या अनुषंगाने राबवलेल्या उपाययोजनांमुळे हे यश मिळाले. ‘स्वच्छ मुंबई’साठी नागरिकांनी केलेले सक्रीय सहकार्य आणि पालिकेचे सफाई कामगार, कर्मचारी, अधिकारी, स्वयंसेवी संस्थांनी रात्रंदिवस केलेल्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाल्याची प्रतिक्रिया या यशानंतर पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी व्यक्त केली तसेच सर्वांचे कौतुकही केले.

महापालिकेने राबविलेल्या उपाययोजना व नागरिकांचे मिळालेले सक्रीय सहकार्य यामुळे कचर्‍याचे हे प्रमाण आता दररोज ७ हजार १०० मेट्रीक टनांपर्यंत खाली आले असल्याचे सांगतानाच ते म्हणाले, २०१५ मध्ये महापालिका क्षेत्रातून दररोज ९ हजार ५०० मेट्रीक टन एवढ्या प्रमाणात कचरा संकलित करण्यात येत होता. यासाठी पालिकेने कचरा वर्गीकरण, कचर्‍यापासून खतनिर्मिती, जनजागृती, प्रदर्शने यासारखे उपक्रम राबवले.