मुंबई-कोल्हापूर : उडा मंगळवारपासून

Flight

कोल्हापूर: मुंबई-कोल्हापूर आणि कोल्हापूर-मुंबई विमानसेवा मंगळवारपासून सुरू होते आहे. ही विमानसेवा सुरू व्हावी म्हणून अनेक वर्षांपासून प्रयत्न चालले होते. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी यासाठी बराच पाठपुरावा केला.

या सेवेच्या सुरुवातीला मुंबई येथून उद्या दुपारी दोन वाजता विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर कोल्हापूरला येतील. आणि शेतकरी, अनाथ आणि अपंग मुले, कचरा वेचणाऱ्या महिला, तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कोल्हापूरहून मुंबईला जातील.