रेल्वे रुळाला तडा गेल्याने हर्बल रेल्वेची वाहतूक ठप्प

मुंबई : हार्बर रेल्वेच्या कुर्ला-चुनाभट्टी स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने वाशीच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. आठवड्याच्या सुरूवातीलाच या अडचणीमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

दिवाळीच्या सुट्टीनंतर अनेक महाविद्यालये आजपासून सुरू झाली आहेत. परिणामी गेल्या काही दिवसांपासून रेल्वेस्थानकांवर कमी झालेली गर्दी आजपासून पूर्ववत वाढली आहे.

या पहिल्याच दिवशी झालेल्या हार्बरच्या लोकलघोळाने गर्दीत भर पडली आहे.तासभरापासून ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.