मुकेश अंबानी यांच्या ड्रायवरचा पगार ऐकून व्हाल थक्क

मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्याकडे गाड्याही महाग आहेत आणि त्या गाड्यांचे ड्रायवरही महागच ! म्हणजे त्यांना पगार भरपूर आहे. भरपूर म्हणजे किती? तुमच्या अंदाजापेक्षा बराच जास्त – २ लाख रुपये महिना!

ड्रायवरचा पगार सामान्यतः २० हजार रुपयांपर्यंत असतो.

अंबानी यांच्याकडे ड्रायव्हरची नोकरी मिळवण्यासाठी परीक्षा द्यावी लागते. मुकेश अंबानी यांच्यासाठी ड्राईव्हर निवडण्याची जबाबदारी एका कंपनीला देण्यात आली आहे. ही कंपनी ड्राईव्हरची निवड करते. त्यानंतर त्यांला प्रशिक्षण दिलं जातं, आणि नंतर त्या ड्राईव्हरला मुकेश अंबानी यांची गाडी चालवण्यासाठी नियुक्त करतात.