दोन मुलांची आई 15 वर्षाच्या मुलासोबत पळाली

नवी दिल्ली : गुरूग्राममधील एका टेंट हाऊसमध्ये काम करणारी दोन मुलांची आई असलेली २६ वर्षीय महिला एका पंधरा वर्षीय मुलाबरोबर पळून गेली आहे.ही महिला व अल्पवयीन मुलगा एकाच टेंट हाऊसमध्ये काम करत होते. तसेच ते एकाच कॉलनीतही राहत होते. त्या दोघांत चांगली मैत्री होती. यावरून दोघांच्या घरात वादही होत असत. यामुळे रोज रोजच्या वादाला कंटाळूनच ते पळून गेले असावे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

महिला पती व चार वर्षाचा मुलगा आणि अडीच वर्षाच्या मुलीबरोबर शीतला कॉलनीत ती राहत होती. त्याच कॉलनीत एक पंधरा वर्षीय मुलगा आपल्या कुटुंबासोबत राहत होता. मिळेल ते काम करुन तो कुटुंबाच्या खर्चाला हातभार लावत होता. त्याच दरम्यान त्याला एका टेंट हाऊसमध्ये काम मिळाले. तेथे एका विवाहित महिलेशी त्याची ओळख झाली. ती त्याच्याच कॉलनीत राहत असल्याने दोघे एकत्र कामावर जायचे. दिवसागणिक त्यांच्यातील जवळीकही वाढली. विशेष म्हणजे हे दोघेही दहा दिवसांच्या अंतराने पळाले आहेत. महिला १२ एप्रिलपासून गायब असून मुलगा २२ एप्रिलला घराबाहेर गेला तो परतलाच नाही.