‘मोनोक्रोम’ची जादू….

monochrome

एव्हर ग्रीन असणारे ब्लॅक अँड व्हाईट काॅम्बिनेशन आजही तितकच हिट आहे. अश्या ब्लॅक अँड व्हाईट काॅम्बिनेशनला मोनोक्रोम असे म्हणतात. तुम्ही कितीही रंगीत कपडे घातलेत तरी एखाद्या पार्टीत मोनोक्रोम ट्रेंड तुम्हाला जितका हटके लुक देईल तितका कुठलाही रंगीत ड्रेस देऊ शकणार नाही. हल्ली बॉलिवूडच्या आघाडीच्या तारका दीपिका पदुकोण, सोनाक्षी सिन्हा, सोनम कपूर, आलिया भट तुम्हाला मोनोक्रोम ड्रेसेसमध्ये हमखास दिसतात. कुठल्याही प्रकारच्या इंडियन, वेस्टर्न किंवा इंडो वेस्टर्न कॉम्बिनेशनमध्येही मोनोक्रोमचा वापर उठावदारच दिसतो. त्यामुळे कॉलेज तरुणीही बॉलिवूडच्या ताराकांना फॉलो करत जीन्स टी-शर्ट आणि त्यांच्या इतर कपड्यांमध्येही मोनोक्रोमचा वापर करताना आढळतात.

तुम्हीही ऑफिस, पार्टी, सण-समारंभ अशा ठिकाणी मोनोक्रोम कॉम्बिनेशनचा वापर नक्की करून पाहा. या प्रकारचे कॉम्बिनेशन कसेही चांगलेच दिसते त्यामुळे जास्त विचार न करता तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट कपडे घालून घराबाहेर पडू शकता. शिवाय इतर रंगांची कटकट नसल्याने त्यावर काय अॅक्सेसरीज घालायच्या यावरही तुम्ही जास्त विचारात पडणार नाही. ब्लॅक कलरमधील कोणत्याही अॅक्सेसरिज तुमच्या कपड्यांच्या अनुशंगाने तुम्ही घालू शकता.