सरसंघचालक मोहन भागवत आज पालघरमध्ये

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज मुंबई येथील पालघरमध्ये आहेत. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आज विश्व हिंदू परिषदेच्या तलासरी प्रकल्प सुवर्णमहोत्सवी वर्ष सांगता दिनाच्या निमित्ताने विराट हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले आहे. विश्व हिंदू परिषदेच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या जनजाती विद्यार्थी वसतिगृह प्रकल्पाचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे.

या संमेलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक आहेत.यावेळी विहिंप आणि आरएसएसचे अनेक वरिष्ठ नेते आणि मार्गदर्शक यावेळी उपस्थितराहणार आहे. या संमेलनाला पालघर जिल्ह्यासह नाशिक, मुंबई, ठाणे या जिल्ह्यातून आणि शेजारच्या गुजरात राज्यातुनही हजारोंच्या संख्येने लोक येणार आहेत.