मोदी यांनी आदिवासी महिलांच्या पायात घातल्या चप्पल

रायपूर : चरम पादुका योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडच्या बीजापूर येथे आदिवासी महिलांना नवीन चप्पल घातल्या. ज्या महिला तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात जातात त्यांना चप्पल उपलब्ध करून देणे हा आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंती निमित्त पंतप्रधान मोदी यांनी बीजापूरला भेट दिली आणि त्यांनी राज्य तसेच केंद्राच्या अनेक योजनांची कोनशिला बसवली. यावेळी त्यांनी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत भारताच्या पहिल्या कल्याण केंद्राची सुरुवात केली. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी अनेक बाबींचा उल्लेख केला.

ते म्हणाले, जर बीजापूर येथे 100 दिवसांत विकास होऊ शकतो तर उर्वरित जिल्ह्यात का होऊ शकत नाही? मी येथे सर्व योजनांना घेऊन आपल्याला आश्वस्त करायला आलो आहे. आता बीजापूरला मागास जिल्हा समजल्या जाणार नाही. पंतप्रधान मोदी यांनी छत्तीसगड येथे विकास कार्यांत केलेल्या महत्वपूर्णय योगदानाबाबत येथील सुरक्षा जवानांचे अभिनंदन केले.