कठुआ-उन्नाववर मोदींनी अखेर मौन तोडले, ते म्हणाले मुलींना न्याय देणे आमची जबाबदारी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर कठुआ, उन्नाव सामुहिक बलात्कार प्रकरणी मौन तोडले. मोदी म्हणाले अशा घटना संपूर्ण देशाला लाजिरवाणी करतात. मुलींना न्याय मिळेल, न्याय देणे आमची जबाबदारी आहे.

नवी दिल्लीतील डॉ आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. ते म्हणाले कि ज्याप्रकारच्या घटना मागील काही दिवसांत झाल्या आहेत. त्या सामाजिक न्याय या धारणेला आव्हान आहे. विशेषकरून गेल्या दोन दिवसांपासून ज्या घटना होत आहे त्या सभ्य, समाजासाठी लाजिरवाणी आहे. एका समाजाच्या रुपात, एका देशाच्या रुपात आम्ही लज्जित आहोत. ते म्हणाले कि या सारख्या घटना आमच्या संवेदना हलवून सोडतात. मी याबाबत विश्वास देऊ इच्छितो कि कुठलाही गुन्हेगार वाचणार नाही. न्याय होईल आणि पूर्ण होईल. आम्हाला या समाजाच्या अंतर्गत वाईट गोष्टीचा नायनाट करावा लागेल. तेव्हा कुठे आम्ही डॉ बाबासाहेबांच्या स्वप्नांचा भारत बनवू शकू.

दलित आणि मागासवर्गिय देशाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावे, असे काँगेसला कधीही वाटले नाही. जेव्हाकि आमचे सरकार बाबासाहेबांनी दाखविलेल्या रस्त्यावक चालताना ‘सबका साथ सबका’च्या मंत्रासोबत समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत लाभ पोचविण्याचा प्रयत्न करीत आहे. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित 5 स्थळांना तीर्थाच्या रुपात विकसित करण्याची संधी प्राप्त झाली आहे. महू येथील डॉ बाबासाहेबांची जन्म भूमी, लंडन येथील डॉक्टर आंबेडकर मेमोरियल त्यांची शिक्षा भूमी, नागपुरातील दीक्षा भूमी, मुंबईतील चैत्य भूमी आणि दिल्लीतील त्यांची महापरिनिर्वाण भूमी.

काँग्रसेवर आरोप करताना मोदी म्हणाले कि, त्यांनी अनेक दशकांपासून देशात असंतुलन कायम ठेवले आहे. आमचे सरकार त्याला दूर करण्याचे प्रयत्न करत आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक सरकार आल्या. मात्र जे काम आधी व्हायला पाहिजे होते ते आज होत आहे. 125 कोटी देशवासियांना आज डॉ आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या निमित्ताने एक अनमोल उपहार मिळाला आहे.

1992 साली 15 जनपथ वर बनलेले आंबेडकर इंटरनॅशळ सेंटरचा विचार समोर आला होता. मात्र 22 वर्षांपर्यंत याची फाईल दबलेली होती. 2015 साली मी या केंद्राची कोनशिला बसवल्याचे ते म्हणाले.