नाणार प्रकल्पासाठी काम करणारं कार्यालय मनसेने फोडलं

मुंबई : नाणार रिफायनरी प्रकल्प कोकणात होणार नाही, असे फर्मान राज ठाकरे यांनी सोडल्यानन्तर मनसेचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. मनसे कामगार सेनेने मुंबईतील ताडदेव येथील नाणार प्रकल्पासाठी काम करणारं कार्यालय फोडलं.
मुंबईतील मुलुंडमध्ये मनसेच्या वतीने 100 महिलांना रिक्षांचं वाटप करण्यात आलं. यावेळी झालेल्या सभेत राज ठाकरेंनी हा इशारा दिला होता.

”नाणार प्रकल्प कोकणात होणार नाही म्हणजे नाही. हा प्रकल्प महाराष्ट्रात झाला नाही, तर गुजरातला जाईल,” अशी भिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखवतात. मात्र, गुजरातच का, असा सवाल करत प्रकल्प कुठेही न्या, पण तो कोकणात होणार नाही, राज्य सरकारला काय करायचं ते करावं, असं राज ठाकरे म्हणाले होते.