मनसेचे नगरसेवकच हप्ता घेतात : फेरीवाला संघटनेच्या मेळाव्यातील आरोप

feriwala-melawa-

डोंबिवली: मनसे नगरसेवक आणि कल्याण डोंबिवली मनपातील विरोधी पक्षनेते फेरीवाल्यांकडून हप्ते घेतात, असा गंभीर आरोप फेरीवाला संघटनांनी केला असून याबाबतचे पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहे. तेव्हा राज ठाकरे यांच्यावर कारवाई करणार का? असा सवाल फेरीवाला संघटनेने केला आहे.

मागील काही दिवसांपासून सुरु असलेले मनसेचे आंदोलन आणि त्यानंतर पालिकेने फेरीवाल्यांवर सुरु केलेली कारवाई, याविरोधात डोंबिवलीतले फेरीवाले एकवटले असून त्यांनी आज (मंगळवार) मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी मनसेच्या नगरसेवकांवरच सनसनाटी आरोप केले. डोंबिवलीत मनसे नगरसेवक राहुल चितळे आणि केडीएमसीतील विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांच्यावर थेट आरोप करण्यात आले.

दरम्यान, यावेळी त्यांनी पालिकेतील फेरीवाला विरोधी पथकावरही त्यांनी टिका केली. या पथकात नेमणूक होण्यासाठी पालिकेत एक ते दीड लाखाचा रेट सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. कारण खालपासून वरपर्यंत सगळेच फेरीवाल्यांकडून हप्ते घेतात. असा आरोप फेरीवाल्यांचा आहे.

या आरोपांनंतर केडीएमसीतील मनसेचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी मात्र हे सारे आरोप फेटाळून लावले आहेत.