मनपातर्फे लोहपुरुष सरदार पटेल जयंती निमित्त “राष्ट्रीय एकता दौड” चे आयोजन

नागपूर : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त ३१ ऑक्टोबर २०१७ रोजी देशभरात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील नागरिकांमध्ये एकतेचा संदेश देण्यासाठी “राष्ट्रीय एकता दौड”चे आयोजन करण्यात येणार आहे.

ही दौड संविधान चौक येथून सकाळी ८ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रीय एकतेची शपथ घेऊन प्रारंभ होईल. त्यांनतर संविधान चौक-एलआयसी चौक-लिबर्टी सिनेमा पॉइंट-जुना व्हीसीए स्टेडियम-आकाशवाणी चौक मार्गे संविधान चौक येथे समारोप होईल.

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आयोजित दौडमध्ये लोकप्रतिनिधी, नागरिक,शासकीय-निमशासकीय अधिकारी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले. दौडची शोभा वाढविण्यासाठी सहभागींनी पांढरे वस्त्र परिधान करावे असेही आवाहन करण्यात आले आहे. “राष्ट्रीय एकता दौड”मध्ये मनपा कर्मचारी सहभागी होणार असून लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त मनपाच्या दहाही झोनमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.

Facebook Comments