सख्या बापानेच केला पोटच्या मुलीवर अत्याचार

पुणे : उत्तरप्रदेश आणि काश्मीर मधील सामूहिक बलात्काराच्या घटनेची शाई अजून सुकलेली सुद्धा नसतांना पिंपरी चिंचवड परिसरातील देहू रोड भागातवडिल मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. या ठिकाणी एकानरा धमाने पोटच्या अवघ्या १२ वर्षाच्या मुलीवरच अत्याचार केल्याची घटनाघडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी या नराधम बापाला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलीची आई मंगळवारी नातेवाई कांकडे गेली होती. तर तिचाभाऊ बाहेर खेळायला गेला होता.

मोठ्या मुलाला या नराधमाने जाणून बुजूनकिराणा आणण्यासाठी पाठवले. त्यानंतर अल्पवयीन मुलीला घराच्या हॉलमध्ये बोलवत कोयत्याच्या धाकाने तिच्यावर अत्याचार केले. तसेच याची वाच्यता कुणाहीकडे करशील तर तुला जीवे मारेन अशी धमकी दिली. पीडित मुलीने हा सगळाप्रकार आपल्या काकूला सांगितला. मुलीच्या काकूने मुलीच्या आईला फोनवर यासगळ्याची माहिती दिली. त्यानंतर आज पहाटे याप्रकरणी देहूरोड पोलिसाततक्रार नोंदवण्यात आली. गेल्या वर्षभरापासून नराधम बाप पीडित मुलीशीअश्लील वर्तन करीत असल्याची कबुली या मुलीने दिली.