मंत्री जानकर दूध उत्पादक व प्रक्रिया संस्थानचे कमिशन एजंट : आमदार बच्चू कडू

कराड : दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर दूध उत्पादक व प्रक्रिया संस्थांचे कमिशन एजंट असल्याचे आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला. दूध पावडरऐवजी दुधाला अनुदान द्यावे, अशी मागणी बच्चू कडू यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी ते कराड येथे आले होते. कराड येथील शासकीय विश्रामगृहात आमदार बच्चू कडू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका सरकारकडून घेतली जात नाही. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढा देण्यासाठी शेतकरी हितासाठी काम करणाऱ्या संघटना एकत्र येऊन काम करण्यासाठी सर्वांना एकत्रित करण्याचे काम सध्या सुरू असल्याचे यावेळी आमदार कडू म्हणाले, ‘अर्थ संकल्पात तरतूद केलेल्या निधीचा वापर अंपगांच्या विकासासाठीच केला पाहिजे. तर कोणी याचा वापर अन्य बाबींसाठी केल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असलेही ते म्हणाले.