पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक

मुंबई :पश्चिम रेल्वे मार्गावर आज म्हणजेच शनिवारी मध्यरात्री मेगाब्लॉक राहणार आहे. माटुंगा ते मुंबई सेंट्रलमध्ये अप आणि डाऊन जलद मार्गावररात्री १२ ते पहाटे ५ मध्ये हा ब्लॉक असेल. त्यादरम्यान माटुंगा ते मुंबई सेंट्रल मध्ये अप आणि डाऊन जलद मार्गावरील वाहतूक अप आणि डाऊन धीम्या मार्गावरून सुरु राहील.

तर मध्य आणि हार्बर रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणे स्थान कांदरम्यान अप धीम्या मार्गावर सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० पर्यंतब्लॉक आहे. या कालावधीत कल्याण ते ठाणे मार्गावरील अप धीमी वाहतूक अप जलदमार्गावरून चालवण्यात येईल. अप धीम्या मार्गावर ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा,कळवा स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत.