कर्नाटकात मायावतीचा उमेदवार विजयी, आठवलेच्या उमेदवारास 1500 मते

बंगळूरू : मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने कर्नाटकात खाते उघडले असून बसपाच्या एन. महेश यांनी कोलेगल विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे ही जागा केंद्रिय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आरपीआयने देखील लढवली होती.

बसपाने या निवडणुकीत देवेगौडांच्या जेडीएसबरोबर युती केली आहे. मायावतींनी बसपा उमेदवारांच्या प्रचारासाठी सभाही घेतल्या होत्या. एन. महेश हे बसपाचे प्रदेशाध्यक्ष कोलेगल मतदारसंघात उभे होते. ७० हजाराहून अधिक मते बसप उमेदवाराने घेत विजय मिळवला आहे. दुसऱ्या क्रमांकावर भाजपचा उमेदवार राहिला आहे. आरपीआयने त्यांच्याविरुद्ध चिक्‍कासावका एस. यांना उमेदवारी दिली होती. स्वत: आठवले त्यांच्या प्रचारासाठी आले होते.

आरपीआयचा उमेदवार जिंकला तर भाजपला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले होते. पण प्रत्यक्षात दीड हजार मते आरपीआय उमेदवाराला मिळाली आहे.