दुपारनंतर निकालाची परिस्थिती बदलणार – मल्लिकार्जुन खरगे

बेंगळुरू : कर्नाटकात भाजपाने मुसंडी मारली असून, कर्नाटकात सत्ता बदलाचे संकेत हाती येत असलेल्या निकालावरून स्पष्ट होतांना दिसत आहे. हाती आलेल्या आकड्यावरून आता भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करणार हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र अजूनही काँग्रेस पक्षाने आपली आशा सोडलेली नाही. मतमोजणीच्या उत्तरार्धात परिस्थिती बदलण्याची आशा काँग्रेस नेत्यांना आसून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी दुपारनंतर चित्र बदलण्याची शक्यता वर्तवली आहे.

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना खरगे म्हणाले की, “मतमोजणीच्या निकालांमध्ये दुपानंतर बदल पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे. सध्या मी जनता दल (सेक्युलर) सोबत संभाव्य आघाडी करण्याबाबत गुलाम नबी आझाद आणि अशोक गहलोत यांच्याशी चर्चा करण्यासाठी जात आहे.”