काँग्रेसपेक्षा ममता आणि चंद्राबाबूंची ताकद जास्त

नवी दिल्ली: काँग्रेसच्या हातून केवळ एक राज्यच गेले नाही तर काँग्रेसच्या वर्चस्वालाच सुरुंग लागला आहे. या निकालानंतर आता देशातील २.५ टक्के लोकसंख्येवरच काँग्रेसची सत्ता राहिली आहे. निवडणुक निकालाने ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष आणि चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीनेही काँग्रेसला मागे टाकले असून दोन्ही पक्षांचा देशातील सर्वाधिक लोकसंख्येवर सत्ता निर्माण झाली आहे.

देशातील लोकसंख्येवर सत्ता असण्याच्या प्रकरणात प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसलाही मागे टाकले आहे. तृणमूल काँग्रेस, ऑल इंडिया अन्ना द्रविड मुनेत्र कळघम, तेलुगू देसम पार्टी आणि तेलंगणा राष्ट्र समितीने काँग्रेसला मागे टाकत देशातील सर्वाधिक लोकसंख्येवर सत्ता निर्माण केली आहे.

तृणमूस सत्तेत असलेल्या पश्चिम बंगालची लोकसंख्या ९.१४ कोटी आहे. देशातील चौथे सर्वाधिक लोकसंख्या असलेले हे राज्य आहे. पश्चिम बंगालची लोकसंख्या देशाच्या लोकसंख्येच्या ७.५५ टक्के एवढी आहे. म्हणजेच तृणमूलने काँग्रेसला याबाबतीत मागे टाकले आहे.