कुछ तो लोग कहेंगे : शशी थरूर

- 'हिंदू पाकिस्तान ... ' वादावर केले ट्विट

नवी दिल्ली : भाजपाने २०१९ च्या निवडणूक जिंकल्या तर देशाचा हिंदू पाकिस्तान होईल असे वक्तव्य काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी दोन दिवसांपूर्वी केले. त्यावरून बरेच वादंग उठले . यावर प्रतिउत्तर देण्यासाठी थरूर यांनी एक ट्विट केले आहे .

शशी थरूर यांनी अमर प्रेम या सिनेमातील गाण्याचा आधार घेतला आहे. ”कुछ तो लोग कहेंगे लोगोंका काम है कहना, छोडो बेकारकी बातोमें बीत न जाए रैना” अशा ओळी लिहित #HinduPakistan असे लिहिले आहे.

शशी थरूर यांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी किशोर कुमार यांच्याच गाण्याचा आधार घेतला. कुछ तो लोग कहेंगे या गाण्याची व्हिडिओ लिंक ट्विट करत आणि किशोर कुमार यांच्या फोटोसह हे गाणे त्यांनी ट्विट केले आहे आणि आपल्यावर टीका करणाऱ्या भाजपाला उत्तर दिले आहे. तुम्ही बोलत राहा मला काही फरक पडत नाही असाच या ट्विटमागचा उद्देश आहे हे स्पष्ट होते आहे.