सावधान!! ‘किचन नॅपकीन’चा वापर.. आरोग्याला घातक…

napkins

स्वयंपाक आटोपल्यावर स्वयंपाक घरातील गॅस, ओटा स्वच्छ केल्याशिवाय काम काही पूर्ण होत नाही. त्यासाठी वारंवार नॅपकीनचा उपयोग करावा लागतो. परंतू किचनमध्ये वावरताना आपण वापरत असलेली नॅपकीन आरोग्याला घातक ठरू शकतो हे तुम्हाला माहित आहे काय?? नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, किचन नॅपकीन जेवण दूषित करण्यास कारणीभूत ठरू शकते असा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.

मॉरिशस युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार किचन नॅपकीनचा  वापर आरोग्याला घातक ठरण्यास कारणीभूत ठरत आहे. १००  किचन नॅपकीनवर करण्यात आलेल्या प्रयोगानुसार, किचन नॅपकीन जेवण बनिवताना हात पुसण्यासाठी वापरले जाते. मात्र या वापरादरम्यान पुरेशी काळजी न घेतल्याने त्यामध्ये ई-कोलाय हा विषाणू आढळतो. प्रामुख्याने नॉन वेज म्हणजेच मांसाहार बनवल्या जाणार्‍या किचनमध्ये हा धोका अधिक असतो. किचन नॅपकीनच्या नमून्यांमध्ये ३६.७% कोलिफॉर्म बॅक्टेरिया, उर्वरित मध्ये एंटरोकोकस, एसपीपी, स्टेफिलोकोकस ऑरियस बॅक्टीरिया सापडले. या पासून बचाव करण्यासाठी किचन नॅपकीन नियमित स्वच्छ करणं आवश्यक आहे. कापडाऐवजी शक्य असल्यास पेपर टॉवेल वापरावे. तसेच किचनमधील गरजेनुसार प्रत्येक कामाला वेगवेगळे टॉवेल ठेवावे. विशेष म्हणजे, मांसाहार करताना स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी आणि स्वयंपाक घराला स्वच्छ ठेवावे.