ट्रम्पशी चर्चेसाठी गेले असता किम ने स्वत: चा पोर्टेबल टायलेटही सोबत नेला

सिओल: अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप आणि उत्तर कोरियाचे तानाशाह किम जोंग-उन आपल्या ऐतिहासिक चर्चेसाठी सिंगापूरला गेले होते. या चर्चेचा पाया याच वर्षी एप्रिलमध्ये रचला गेला जेव्हा किम जोंग दक्षिण कोरियाला गेले होते. मात्र किम ने यादरम्यान अमेरिकी राष्ट्रपतीसोबत चर्चेसाठी एका अटीवर होकार दिला ती म्हणजे ते (किम) आपल्यासोबत आपला टॉयलेट आणतील.

दक्षिण कोरियाच्या वृत्तसंस्थेनुसार जेव्हा या आठवड्याला किम एअर चायनाच्या बोईंग 747 विमानाने सिंगापूरला पोहचले तेव्हा त्यांच्यासोबत एक आयएल-76 मालवाहतूक विमानसुद्धा होते. ज्यामध्ये त्यांचे जेवण, बुलेटप्रुफ लिमोझिन(कार) आणि एक पोर्टेबल टॉयलेटसुद्धा होते.

उत्तर कोरियाई गार्ड कमांड येथे काम केलेले आणि 2005 साली दक्षिण कोरियाला पळालेले ली यन कियोल यांनी वॉशिंग्टन पोस्टला सांगितले कि सार्वजनिक शौचालयाचा वापर करण्याऐवजी उत्तर कोरियाच्या या नेत्याकडे एक स्वत:चा टॉयले आहे. जो त्यांच्यासमवेतच असतो.

जेव्हा त्यांना याचे कारण विचारले गेले तेव्हा त्यांनी सांगितले कि, त्यांच्या आरोग्याशीसंबंधीत माहिती त्यांच्या मलात असल्यामुळे ते त्याला तिथे सोडू इच्छित नाही. उत्तर कोरियाचे नेते जेव्हा देशातील सैनिकी तळाचा किंवा कारखान्याचा दौरा करतात. तेव्हा हा टॉयलेट त्यांच्यासोबत असतो.

एवढेच नव्हे तर दक्षिण कोरियाच्या न्यूज एजंसीच्या अनुसार किमच्य मोटारीच्या ताफ्यात नेहमीच एक अशी गाडी असते ज्यामध्ये त्यांचा टॉयलेय सोबत असतो. 2015 मध्ये किमच्या सुरक्षा दलातील जवळच्या सुत्रांनी सांगितले डेली एनकेला सांगिततले होते कि,’हे रेस्ट रुम फक्त किमच्या ट्रेनमध्येच नसतो. तर ते जेव्हा प्रवास करतात. तेव्हा त्यांच्या छोट्या वाहनातसुद्धा असतो. विशेषकरून ते जेव्हा पहाडी किंवा बर्फावर चालण्यासाठी बनविण्यात आलेल्या वाहनांने प्रवास करतात तेव्हासुद्धा या सोयी उपलब्ध असतात. सोबतच त्यांच्या ताफ्यात अशा अनेक गाड्या असतात जेणेकरून कुणाला थांगपत्ता लागू नये कि कुठल्या गाडीत किम आहे.