“खमंग खुसखुशीत असे सुजी पकोडे”

pakode

पाऊस पडयला लागला की आधी भजीचीच आठवण येते. तर नेहमी नेहमी एकाच प्रकारची भजी बनवण्यापेक्षा आज थोडी हटके व मस्त खमंग कुरकुरीत रव्याची भजी म्हणजेच “सूजी पकोडे” बनूया. कसे ते पहा..

साहित्य :-  pakode

 • रवा (जाडसर) २ वाट्या
 • पातळ दही १ वाटी
 • कांदा १ बारीक चिरून
 • कच्चा बटाटा १ किसून
 • कोथंबिर , कढीपत्ता चिरून
 • हिरवी मिरची व आलं चिरून आवडीनुसार
 • मीठ चवीनुसार
 • लाल मिरचीपूड अर्धा चमचा
 • धना-जिरा पावडर १ टीस्पून
 • बेकिंग सोडा पाव टीस्पून किंवा इनो पावडर १ टीस्पून
 • तेल तळण्यासाठी
 • पाणी गरजेनुसार

कृती :- प्रथम एका बाऊलमधे रवा घ्यावा. त्यामधे बेकींग सोडा सोडून वर दिलेले सर्व साहित्य घालावे व एकत्र ढवळून १५ मिनिट झाकून ठेवा. पंधरा मिनिटानंतर मिश्रण परत एकदा व्यवस्थित ढवळावे व गरज वाटली तर थोडे पाणी घालावे. कारण रवा फुलतो. नेहमीच्या भजी पीठा इतपतच घट्ट ठेवावे. आता तयार मिश्रणात सोडा घालावा व ढवळून गरम तेलात मध्यम आकाराची भजी तळून काढावी. तेलात भजी सोडताना तेल एकदम गरम असावे. नंतर गँस कमी करावा व मध्यम आचेवर सोनेरी रंगावर भजी तळावीत. मस्त गरमा-गरम व कुरकुरीत भजी साँस सोबत किंवा नुसतीच मिरची सोबत खायला द्या.