खडसेंच्या तक्रारीवरून अंजली दमानियांविरुद्ध गुन्हा दाखल

- त्रास देणाऱ्यांना छळणार : इशारा

मुंबई : एकनाथ खडसे यांच्या तक्रारीवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधात जळगावच्या मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाचं म्हणजे एकनाथ खडसे यांनी स्वतःच अंजली दमानियांविरोधात तक्रार केली आहे. अंजली दमानियांवर फसवणूक, बनावट दस्ताऐवज तयार करणं आणि दस्ताऐवज चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यानंतर एकनाथ खडसे म्हणाले की गेली दोन वर्षं मला ज्यांनी ज्यांनी त्रास दिलाय, त्यांना आता छळणार; माझा संघर्ष सुरूच राहील.