भोसरी प्रकरणात खडसेंना क्लिनचीट

पुणे : महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना भोसरी भूखंड प्रकरणात माजी एसीबीने क्लीन चिट दिली. खडसे यांनी 40 वर्षे पक्षाचे काम केले असून त्यांच्या मंत्रिमंडळ पुनरागमनाचा निर्णय हायकमांड घेईल. एसीबीने न्यायालयात शपथपत्र सादर केले असून तक्रारकर्त्यांना काही आक्षेप असल्यास न्यायालयात याबाबत प्रश्न उपस्थित करता येईल, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर कमी व्हावेत या दृष्टीने गेल्या तीन ते चार महिन्यांत तीन हजार कोटींची सूट देण्यात आली. पेट्रोलचे दर पुन्हा कमी करण्यासाठी योग्य वेळी निर्णय घेण्यात येर्इल, असे ते म्हणाले. आगामी निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती व्हावी. 15 वर्षे आघाडी सरकारच्या मगरमिठीतून जनतेला सोडवल्यानंतर त्यांना पुन्हा सत्तेत येण्यासाठी मोकळीक देणे चुकीचे आहे. राज्यात 36 हजार पदे भरतीची प्रक्रिया राबवण्यात येणार असून त्याचा कोणताही ताण सरकारवर पडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्यावर्षी 92 हजार कोटी उत्पन्नाचे लक्ष्य होते. मात्र, एक लाख १२ हजार कोटी उत्पन्न प्राप्त झाल्याने आर्थिक ताण जाणवणार नसल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.