केसांसाठी फायदेशीर ‘कापूर’

Camphor
कापूर पूजेसाठी किंवा आरती करताना वापरतात. आरतीच्या वेळी कापूर जाळून वातावरण शुद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो. याच कापरामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. विशेषत: केसांच्या आरोग्यासाठी. कापराच्या तेलाने केसांचे आरोग्य चांगले राहतेच त्याचबरोबर कोंडाही कमी होतो. बाजारात कापराचं तेल विकत मिळतंच; पण घरीदेखील ते बनवता येतं. ही प्रक्रिया अगदी साधी आहे. शुद्ध खोबरेल तेलात कापराच्या वड्याटाकाव्यात आणि हवाबंद बाटलीत हे तेल साठवावं. यामुळे कापराचा वास उडून जात नाही. कापराचा सुवास मन शांत करणारा आहे. त्यामुळे या तेलाने तुम्हाला शांत वाटेल.
कापराच्या तेलाने १५ ते २0 मिनिटे डोक्याला मसाज केल्यास केसांचे आरोग्य सुधारते. या मसाजनंतर गरम पाण्यात भिजवलेला टॉवेल केसांभोवती लपेटावा अथवा केसांवर गरम वाफ घ्यावी. यामुळे तेल केसात मुरण्यास मदत होते. त्यानंतर सौम्य शाम्पूने केस धुवूनटाकावेत. तुम्ही तेलमध्ये अंडी किंवा दही मिळवुन सुद्धा लावु शकता. हे लावल्यानंतर एक तासाने केस धुवून घ्या. कापराची अँलर्जी असू शकते म्हणूनच वापर करण्याआधी चाचणी करणे आवश्यक आहे.