भाजपाने लोकशाही डावलून संविधानाची खिल्ली उडवली

नवी दिल्ली : कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ येडियुरप्पा यांनी घेतली यावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला .

बहुमत नसताना सरकार स्थापन करणारा भाजप लोकशाही डावलून संविधानाची खिल्ली उडवत आहे, अशी टीका त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली .

भाजप संविधानाची खिल्ली उडवत आहे. भाजप आज विजयी जल्लोष करेल, तर दुसरीकडे संपूर्ण देशाला लोकशाहीच्या पराभवाचं दुःख असेल, असं ते म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने येडियुरप्पांचा शपथविधी रोखण्यास नकार दिल्यानंतर आज सकाळी त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याआधी राहुल गांधी यांनी ट्विट करून भाजपवर टीका केली. बहुमत नसताना भाजप अट्टाहासाने सरकार स्थापन करत आहे.