कर्नाटकात भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करणार

बंगरुळु : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेली कर्नाटक विधानसभेत कुठला पक्ष आपला झेंडा फडकवेल हे आता स्पष्ट होतांना दिसत आहे. कर्नाटकात भाजपाने मुसंडी मारली असून, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांचा पहिलाच पराभव होतांना दिसत आहे. कर्नाटकात सत्ता बदलाचे संकेत हाती येत असलेल्या निकालावरून स्पष्ट होतांना दिसत आहे. हाती आलेल्या आकड्यावरून आता भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपा हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उभा राहतांना दिसत आहे. कर्नाटक निवडणुकीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू कायम असल्याचे दिसून येत आहे. भाजपाची घोडदौड सुरु असून काँग्रेस मात्र पिछाडीवर असल्याचे हाती आलेल्या आकड्यांवरून स्पष्ट होत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपा ११९ जागांवर आघाडीवर असून, काँग्रेस ५७ तर किंगमेकर ठरू शकणारा जेडीएस पक्ष ४४ जागांवर आघाडीवर आहे. तर २ अपक्ष उमेदवार आघाडीवर आहे.

भाजपा ज्याप्रमाणे मुसंडी मारत आहे त्यावरून कर्नाटकात काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागेल असं बोलल्या जात आहे. हाती येत असलेल्या निकालानंतर काँग्रेसच्या हातून कर्नाटकाची सत्ता गेली असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपाच्या घोडदौडीचा परिणाम शेअर बाजारातही जाणवला आहे. आज शेअर बाजाराने उसळी मारली आहे.