कर्नाटक निवडणूक ; भाजपच्या आघाडीनंतर शेअर बाजारने गाठला उच्चांक

मुंबई: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाने मारलेल्या उसंडीनंतर शेअर बाजारने मोठा उच्चांक गाठला आहे. आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली. सुरूवातीचा काही काळ काँग्रेसने आघाडी घेतली होती.

मात्र, त्यानंतर भाजपाने जोरदार मुसंडी मारत काँग्रेस आणि जनता दल (सेक्युलर) या दोन्ही पक्षांना बरेच पाठी टाकले. हे कल हाती आल्यानंतर सेन्सेक्स तब्बल 200 अंकांनी वधारला. तर निफ्टी 10850 च्या पातळीवर जाऊन पोहोचला .
कर्नाटक विधानसभेच्या २२४ पैकी २२२ जागांसाठी १२ मे रोजी ७२ टक्के मतदान झाले होते.