जेडीएसच्या आमदारांना भाजपाकडून १०० कोटींची ऑफर : कुमारस्वामी यांचा आरोप

बंगळुरू : कर्नाटकमध्ये भाजपाकडून जनता दल सेक्यूलरच्या आमदारांना १०० कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा खळबळजनक खुलासा पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार कुमारस्वामी केला आहे.

सत्ता स्थापनेसाठी भाजपाला पाठिंबा द्यावा, यासाठी जेडीएसच्या आमदारांना 100 कोटी आणि कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर देण्यात येत आहे. हा काळा पैसा येतो कुठून? आता आयकर विभागाचे अधिकारी कुठे आहेत?, असे प्रश्न कुमारस्वामी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना उपस्थित केले.

आमच्या आमदारांना १०० कोटी रुपये आणि मंत्रिमंडळात महत्त्वाच्या खात्यांची ऑफर दिली जात आहे, असे कुमारस्वामींनी सांगितले. ते गरीबांचे सेवक असल्याचे सांगितले जाते. मग त्यांच्याकडे काळा पैसा कुठून येतो आणि आयकर विभागाचे अधिकारी काय करत आहेत, असा सवाल त्यांनी यावेळी विचारला विचारला.
मला दोन्ही पक्षांनी ऑफर दिली होती. पण २००४ आणि २००५ मध्ये मी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने माझ्या

वडिलांच्या राजकीय कारकिर्दीवर एक कलंक लागला. हा कलंक पुसण्यासाठीच मी काँग्रेससोबत जात आहे, असे कुमारस्वामी यांनी नमूद केले.

‘मी निकालावर समाधानी नाही. कर्नाटकात मोदी लाट नसून भाजपाला अपेक्षित यश मिळालेले नाही. देशातील अन्य राज्यांमध्ये भाजपाने जे केले त्यानुसार कर्नाटकमध्ये त्यांना सत्तास्थापनेचा अधिकार नाही, असे त्यांनी सांगितले. गोवा, मणिपूरमधील भाजपाच्या सत्तास्थापनेसंदर्भात ते बोलत होते. मी मुख्यमंत्रीपदाच्या मागे धावत नाही. पण आम्ही कर्नाटकात सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेला बहुमताचा आकडा ओलांडला आहे, असा दावा त्यांनी केला.