कर्नाटक निवडणूक ; भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा आघाडीवर

बंगळुरू : अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या आणि अनेक अर्थाने महत्वाच्या असणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. सकाळी ८ वाजता कर्नाटकातील ४० मतदान केंद्रांवर या मतमोजणीला सुरुवात झाली. भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी.एस. येडियुरप्पा शिकारीपूरा मतदारसंघातून आघाडीवर आहेत. शिकारीपूरा विधानसभा मतदारसंघात येडियुरप्पांचेच वर्चस्व आहे . फक्त १९९९ साली शिकारीपूरा मतदारसंघातून महालिंगाप्पा यांनी काँग्रेसच्या तिकिटावर येडियुरप्पांचा पराभव केला होता.

काँग्रेस उमेदवार गोनी मालातेषा पिछाडीवर पडले आहेत. या मतदारसंघात लिंगायत समाजाची मते निर्णायक असून येडियुरप्पा लिंगायत समाजाचे आहेत. त्याचमुळे ते भाजपाने मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बनवले आहे. कर्नाटकात भाजपाचा विजय होईल व आपणच कर्नाटकाचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ असा दावा येडियुरप्पा यांनी केला आहे.

भाजपाने २००८ साली येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकात दणदणीत विजय मिळवल्यानंतर येडियुरप्पा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले. पण नंतर भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

२२४ पैकी २२२ जागांसाठी १२ मे रोजी येथे मतदान झाले होते. त्यांपैकी आर. आर. नगर येथील गैरप्रकार तर जयनगर मतदारसंघात भाजप उमे