‘मणिकर्णिका’च्या सेटवर कंगना दिसली ‘झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या’ वेशात

मुंबई: अभिनेत्री कंगना रनौतचा आगामी चित्रपट ‘माणिकर्णिका’ च्या सेटवरून झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या वेशातील कंगनाचे फोटो लिक झाले आहेत. या फोटोंमध्ये कंगना शुभ्र वस्त्रप्रावरणांमधे दिसत असून तिच्या चेहऱ्यावर राजेशाही रुबाब आहे. तसेच तिच्या डोक्यावर फेटा व हातात तलवारसुद्धा दिसत आहे.

दाक्षिणात्य दिग्दर्शक कृष ‘मणिकर्णिका’ चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहे. तर याची कथा बाहुबलीची लेखक के. विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिली आहे. यामधे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि मराठी अभिनेता वैभव तत्ववादी यांच्या देखील भूमिका आहेत. हा चित्रपट २७ एप्रिल २०१८ रोजी प्रदर्शित होईल.