या कार्यक्रमात दिसणार कमल हसन आणि सलमान खानची जुगलबंदी

Jugal Bandi

दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील सुपरस्टार कमल हसन सध्या त्यांचा आगामी चित्रपट विश्वरूपम च्या जोरदार प्रमोशन करत आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशन साठी ते लवकरच सलमान खानच्या दास का दम मध्ये सहभागी होणार आहेत. सलमान खान आणि कमल हासन हे दोघेही अनेक वर्षं अभिनय क्षेत्रात असले तरी त्या दोघांनी कधीच एकत्र काम केलेले नाही. परंतु या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे दोघे पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. सलमान खान चा दस का दम सध्या चांगली टीआरपी मिळवत आहे. त्यात कमाल हसनच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमान खानचे हे कार्यकम बेस्टच म्हणावे. कमल हसन या कार्यकमात जरी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करणार असले तरी ते खेळ ही खेळणार आहेत. नुकतेच त्यांनी या कार्यक्रमासाठी चित्रीकरण केले असून या दोन्ही सुपरस्टारला एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक वाट पाहात आहेत.