कल्याण – डोंबिवली परिसराला भूकंपाचे धक्के

कल्याण : ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसराला १३ जुलैच्या रात्री साडेनऊच्या सुमारास २.८ रिश्टर स्केलच्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले. कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली, उल्हासनगर, टिटवाळ्यासह कल्याणजवळील ग्रामीण भागात हे हादरे बसल्याची माहिती आहे.

रात्री ९ वाजून ३१ मिनिटांच्या सुमारास कल्याण डोंबिवली परिसरात अचानक कंपनं आणि हादरे बसण्यास सुरुवात झाली. २ ते ३ मिनिटं हे हादरे जाणवल्याचे कल्याण डोंबिवलीतील नागरिकांनी म्हटले आहे. अनेक भागात नागरिक घाबरून घराबाहेर आले होते. हादऱ्यांमुळे काही घरातील भांडी पडल्याचे लोकांनी सांगितले.

हे धक्के भूकंपाचे असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले आहे.