काश्मीरमध्ये दहशतवाद्‍यांनी केलं जवानाचं अपहरण

नवी दिल्ली : जम्‍मू काश्मीरच्या पुलवामा जिल्‍ह्‍यामध्ये दहशतवाद्‍यांनी आज लष्कराच्या एका जवानाचं अपहरण केले आहे. या जवानाचे नाव औरंगजेब असे असून, पुंछ जिल्‍ह्यातील रहिवासी आहे. गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून वारंवार लष्कराच्या जवानांना हल्ले केले जात आहे.

मिळालेल्‍या माहितीनुसार, औरंगजेब हा ४४ राष्‍ट्रीय रायफल्‍सचा जवान आहे. तो शोपियां जिल्‍ह्‍यात तैनात होता. तो अॅंटी टेरर ग्रुपचा सदस्‍य होता. सुट्‍टीला घरी जात असताना त्‍याच अपहरण करण्यात आले आहे.

जम्‍मू काश्मीरमध्ये रमजानच्या काळात शस्‍त्रसंधी लागू असताना, गेल्‍या काही दिवसांपासून दहशतवाद्‍यांच्या कारवाईत मात्र वाढ झाल्‍याचं दिसून येत आहे. काल बुधवारी रात्री दहशतवाद्‍यांनी पोलिस अधिकारी आणि एका स्‍थानिक नागरिकाचेही अपहरण करण्यात आले आहे. या दोघांचा पोलिस तपास करत आहेत. मात्र त्‍यांचा अजूनही शोध लागू शकलेला नाही.