मुंबई खरच सुरक्षित आहे का?; उद्धव ठाकरेंचा सवाल 

मुंबई : भारतात शांतता भंग करण्याच्या उद्देशाने पाकिस्तानातून दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेऊन मुंबईत आलेल्या एका संशयित दहशतवाद्याला महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ताब्यात घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामानातील अग्रलेखाच्या माध्यमातून मुंबईच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.
मुंबईसारखी शहरे गर्दीची आहेत व येथे कुणाचा पायपोस कुणाला नाही. त्यामुळे मुंबई सुरक्षित आहे काय हा प्रश्न नेहमीच उपस्थित होतो. पुन्हा ज्या खात्याने मुंबईचे रक्षण करायचे ते राज्याचे गृहमंत्रालय राजकीय विरोधकांचा काटा काढण्याचे हत्यार म्हणून वापरले जात आहे. एक ‘मिर्झा’ जेरबंद झाला असला तरी अनेक मिर्झा मोकाट आहेत. मुंबईत अतिरेकी घुसतात ते महाराष्ट्राचा विध्वंस करायला व राष्ट्रवादी हिंदुत्ववादी शक्तींवर हल्ला करायला. पण आम्ही अशा पाकड्या मनसुब्यांना भीक घालणार नाही. मुंबईचे रक्षण करायला हवे. पण गृहखाते त्याकामी सक्षम आहे काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
आजचा सामना संपादकीय….
जगात दोन भयंकर दहशतवादी हल्ले झाल्याचे वृत्त रविवारी आले. त्याचवेळी पाकिस्तानातून प्रशिक्षण घेऊन आलेल्या एका दहशतवाद्यास मुंबईत जेरबंद करण्यात आले आहे. ‘२६-११’ च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता व हे हल्ले पाकिस्ताननेच घडवले असल्याची कबुली माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी नेमकी याचवेळी द्यावी हासुद्धा योगायोगच समजायचा काय? मुंबई पुन्हा ‘टार्गेट’वर आहे व रक्तपात आणि हिंसाचार घडविण्याचे कारस्थान हिरव्या पडद्यामागे शिजले आहे. पंतप्रधान नेपाळात देव देव करीत फिरत होते तेव्हा संभाजीनगरात धर्मांध शक्तींनी हैदोस घातला होता.
कर्नाटकात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान सुरू असताना सर्व वृत्त वाहिन्यांवर पंतप्रधान मोदींचे नेपाळमधील ‘धर्मकारण’ आवर्जून दाखविले जात होते. पूजा – अर्चा, आरती यात मोदी तल्लीन असल्याचे दाखवून विधानसभा निवडणुकांसाठी एकप्रकारे प्रचारच सुरू होता. अर्थात हा प्रचार त्यांचा त्यांनाच लखलाभ ठरो. आम्ही सदैव विचार करतो ते देशाच्या सुरक्षेचा. मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा कट उघडकीस झाल्यावर आमच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. भीमा-कोरेगाव दंगलीमागे नक्षलवादी व बाहेरील शक्ती होत्या व त्या शक्तींनी दोनेक दिवस महाराष्ट्रास वेठीस धरले होते. माओवाद्यांपासून नक्षलवाद्यांपर्यंत सर्वच
महाराष्ट्रात बिळे खणली आहेत. बांगलादेशी तर घुसलेच आहेत व  ‘२६/११’ नंतर पाक पुरस्कृत अतिरेक्यांनी मुंबईस ‘टार्गेट’ केले आहे. आता जो फैजल मिर्झा हा पाकड्या अतिरेकी मुंबईत पकडला गेला तो आयएसआयचा हस्तक आहे. तो आता पकडला गेला असला तरी त्याचे लोक आधीच मुंबईत ‘पोझिशन्स’ घेऊन बसले आहेत. मुंबईत त्यांना फक्त बॉम्बस्फोट घडवायचे नव्हते तर महत्त्वाच्या राजकीय व्यक्तींना ठार करून दंगली भडकवण्याचेही त्यांचे कारस्थान होते. फैजल मिर्झा हा मानवीबॉम्ब असल्याचे सांगण्यात येते. अर्थात एक मिर्झा पकडला गेला असला तरी अनेक मिर्झा आपल्या आसपास स्फोटके पेरत आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती खरी मानावी तर अटक करण्यात आलेला दहशतवादी मिर्झा हा लोन वुल्फ अटॅक करणार होता. यात एकटा दहशतवादी वर्दळीच्या ठिकाणी स्फोटकाने भरलेली गाडी घुसवतो अथवा गर्दीत घुसून अंदाधुंद गोळीबार करतो. मिर्झा याला पाकिस्तानातून याच ‘शुभ’ कार्यासाठी रसद पुरवली जात होती. अशा प्रकारचे हल्ले या आधी फ्रान्स, लंडन व अमेरिकेत झाले आहेत. रविवारी ‘इसिस’ने एकाचवेळी फ्रान्ससह अफगाणिस्तान आणि इंडोनेशियामध्ये हल्ले केले. त्यात सुमारे २० बळी गेले. इंडोनेशियात तीन चर्चवर आत्मघाती हल्ले झाले. अफगाणिस्तानातील जलालाबादेत हल्ला झाला. पॅरिसमध्ये भरगर्दीत अतिरेकी घुसला व त्याने अनेकांना चाकूने मारले. हे चित्र आता जगभराचे आहे.
आहेत व येथे कुणाचा पायपोस कुणाला नाही. त्यामुळे मुंबई सुरक्षित आहे काय हा प्रश्न नेहमीच उपस्थित होतो. पुन्हा ज्या खात्याने मुंबईचे रक्षण करायचे ते राज्याचे गृहमंत्रालय राजकीय विरोधकांचा काटा काढण्याचे हत्यार म्हणून वापरले जात आहे व पुढचा महिनाभर गृहखात्यावर पालघर पोटनिवडणूक लढण्याची जबाबदारी असणार आहे. त्यामुळे एक ‘मिर्झा’ जेरबंद झाला असला तरी अनेक मिर्झा मोकाट आहेत. मिर्झा व त्याच्या टोळीवर राजकीय व्यक्तींना खतम करण्याची जबाबदारी होती. या राजकीय व्यक्ती नेमक्या कोण? व अतिरेक्यांच्या डोळय़ांत नेमके कोणत्या पक्षाचे नेते खुपत आहेत? हे सांगायला कुण्या ज्योतिषाची गरज नाही. पाकिस्तानचे अतिरेकी पहिल्यापासून शिवसेनेवर जळत आहेत व त्यांच्या मार्गातील सर्वात मोठा अडसर शिवसेनाच आहे. जीना हे महापुरुष आहेत व त्यांचे फोटो सन्मानाने लावा, असे भाजप खासदारांनी उघडपणे सांगितल्यावर भाजप पाकडय़ांच्या टार्गेटवर असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचा तर याबाबतीत विचारही करता येत नाही. मुंबईत अतिरेकी घुसतात ते महाराष्ट्राचा विध्वंस करायला व राष्ट्रवादी हिंदुत्ववादी शक्तींवर हल्ला करायला. पण आम्ही अशा पाकड्या मनसुब्यांना भीक घालणार नाही. मुंबईचे रक्षण करायला हवे. पण गृहखाते त्याकामी सक्षम आहे काय? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.