आयपीएल बेटिंग : सलीम खान सट्टा लावायचे

- बुकी सोनूने सांगितले

मुंबई : सलीम खान पूर्वी सट्टा लावत होते, मात्र ते आताही सट्टा लावतात का हे माहीत नसल्याचं सोनू जलानने म्हटलं आहे. सोनूने दिलेल्या या माहितीमुळे सलीम खान यांचा आयपीएल बेटिंग प्रकरणात सहभाग असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आयपीएल बेटिंग प्रकरणात अभिनेता अरबाज खानने कबुली दिल्यानंतर आता अरबाजचे वडील सलीम खान यांचं नावही समोर आलं आहे.

गेल्या पाच वर्षांपासून अरबाज बुकी सोनू जलानच्या संपर्कात होता. आंतरराष्ट्रीय सामन्यांवर आपण आतापर्यंत सट्टा लावला असून बेटिंगमध्ये काही वेळा जिंकल्याचीही कबुली अरबाजने दिली. मात्र आमच्या कुटुंबाला सट्टा लावणं आवडत नाही, मी बेटिंगमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र बुकी सोनू जलानने जुनी रेकॉर्डिंग्स ऐकवून ब्लॅकमेल केलं, दबाव आणला, असं अरबाज म्हणाला होता.

आतापर्यंतच्या चौकशीत सोनूच्या संपर्कात देशातले 80 ते 90 बडे बुकी आणि अनेक सेलिब्रेटी असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे लवकरच खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात बड्या असामींची हजेरी लागण्याची शक्यता आहे.