ट्रम्प यांना प्रजासत्ताक दिन कार्यक्रमासाठी निमंत्रण

नवी दिल्ली : २०१९ च्या प्रजासत्ताक दिनासाठी भारताने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना निमंत्रित केलं आहे.

भारताकडून ट्रम्प यांना निमंत्रित केल्याची माहिती ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या सूत्रांनी दिली आहे. यावर्षी एप्रिलमध्ये भारतानं ट्रम्प यांना निमंत्रण पाठवलं होतं. मात्र, त्यावर अमेरिकेकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. भारताच्या निमंत्रणावर ट्रम्प प्रशासन सकारात्मक विचार करत असल्याचे संकेत मिळत आहेत. ट्रम्प यांनी भारताचं निमंत्रण स्वीकारल्यास भारताच्या परराष्ट्र धोरणाचं हे मोठं यश असेल, असं बोललं जात आहे.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की २०१५ मध्ये प्रजासत्ताक दिनी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.